स्वयंसेवी संस्थांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ :नवाब मलिक 

0
44

मुंबई: सोच मल्टिपर्पज सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयम् वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात 1 लाख 99 हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. यापुढील काळातही हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. यासाठी सीएसआरमधूनही मोठे सहकार्य मिळत असून सोच मल्टिपर्पज सोसायटीसारख्या विविध स्वयंसेवी संस्थाही सहकार्य करीत आहेत. सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे ते म्हणाले.