हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट! कारण अस्पष्ट..

0
44

सध्या महाराष्ट्रात राजकीय हालचाली अधिक होतांना दिसून येत आहेत आता यामध्ये हार्दिक पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. हार्दिक पटेल यांची पवार सिल्व्हर ओक येथे निवासस्थानी भेट झाली. युवा कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत होते आणि देशाच्या राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ शरद पवार यांच्यासमवेत हार्दिकच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ ‘गुजरात कॉंग्रेस’चे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल हे सध्या चर्चेत आहेत.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास असल्याचे हार्दिक यांनी वारंवार सांगितले आहे पण गुजरात कॉंग्रेसचे नेतृत्व काळ पाळण्यास तयार नाही. गुजरात कॉंग्रेसमध्ये हार्दिक पटेल यांना अधिकाधिक महत्त्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे, तरीही शरद पवारांशी त्यांची भेट कोणत्याही नव्या राजकीय आघाडीचा भाग असू शकते. रंगाच्या हार्दिक यांनी मुंबईत काही कॉंग्रेस नेत्यांशी भेट घेतली आहे, पण शरद पवार यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा नवीन विषय आहे