होळीच्या दिवशीच पालघरमधील संसाराची झाली राख,चौघांचा होरपळून मृत्यू

0
25

पालघर :काल (28 मार्च) रोजी पालघर मधील एका घराला अचानक आग लागली. ही आग ब्राह्मण पाड्यात लागली होती यामध्ये वृद्ध सासू, सून आणि दोघा नातवंडांचा मृत्यू झाला. मुलगा आणि दोघं नातवंडं आगीत जखमी झाले आहेत. आग लागली या वेळी यावेळी घरात एकूण सात जण होते.अअचानक लागलेल्या आगीत पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केलं. घरमालक अनंता मोळे, त्यांची चार मुलं, पत्नी आणि वृद्ध आई आगीत अडकले. या घटनेत अनंता मोळे यांची दोन मुलं, आई आणि पत्नीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीच्या घटनेत अनंता मोळे आणि दोन मुलं बचावली आहेत. नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत