६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, ‘छिछोरे’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा तर कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार … 

0
29

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली गेली. कोरोना व्हायरसमुळे यावेळी पुरस्कारांची घोषणा उशीरा करण्यात आली. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी एकूण ४६१ फिचर फिल्मची यादी देण्यात आली होती. राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये आयोजित होणाऱ्या या पुरस्कारांच्या घोषणेची माहिती पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. २०१९ या वर्षातील पुरस्कारांची घोषणा आज केली गेली.सुशांत सिंग राजपूत याच्या ‘छिछोरे’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुशांतसह छिछोरेमध्ये श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रतीक बब्बर, ताहिर राज यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिला मणिकर्णिका आणि पंगा या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी तिला फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स या सिनेमांसाठी पुरस्कार मिळाला आहे