कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा 100वा दिवस

0
33

दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वे 5 तासांसाठी रोखून धरला जाणार आहे. या व्यतिरिक्त डासना, दुहाई, बागपत, दादरी, ग्रेटर नोएडा येते रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी काळी पट्टी बांधून आपला विरोध व्यक्त करणार आहे. टोल प्लाझासुद्धा फ्री करण्याचा प्रयत्न असणार आहेत.
शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी आंदोलन करत आहेत. यासाठी सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्तावही दिला आहे. मात्र शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.