बोगस आधारकार्ड बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड, १२ जणांना अटक

0
31

मुंबई: डिजिटल युगात अनेक गोष्टी अगदी एका क्लीकने शक्य होत आहेत मात्र यामुळे सायबर गुन्ह्यात सुद्धा वाढ झाली आहे .असाच एक प्रकार मुंबईतील बोरिवलीत घडला आहे.अधिकृत सेंटरमधून बोगस आधारकार्ड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी नेपाळी नागरिकांसह एकूण 12 जणांना अटक केली आहे. या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक परदेशी भारतीय नागरिकांना आधारकार्ड बनवून दिले आहे. या टोळीकडून पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरलेले 12 मोबाईल, संगणक, फिंगर प्रिंट स्कॅनर, प्रिंटर, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे. एका कार्डमागे ही टोळी चार ते पाच हजार रुपये घेत होते.या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.