महाराष्ट्रात 24 तासात 13,659 नवीन रुग्ण

0
43

 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 13,659 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात गेल्या 24 तासांमध्ये 21,814 नवीन रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये 114 जणांनी जीव गमावला असून 17,674 रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 4,020 ची वाढ झाली आहे.

राज्यसरकारकडून एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यसरकार काही भागांमध्ये कडक निर्बंध करण्याचा विचार करत आहे, तसेच त्या दिशेने वाटचाल देखील राज्यसरकार कडून करण्यात आली आहे. कारण काही दिवसांपासून काही ठराविक ठिकाणी जिथे कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे तिथे कडक निर्बध करण्यात आले आहेत.