देशात 24 तासांत 15,388 नवे रुग्ण!

0
40

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना आता देशातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या  झपाट्याने वाढताना दिसते. देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,12,44,786 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,57,930 इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यानुसार सोमवारी दिवसभरात 16,596 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,08,99,394 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,87,462 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील केले जाते.