देशात 24 तासांत 17,921 नवे रुग्ण

0
26

देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून मागील 24 तासांत 17,921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,12,62,707 वर पोहोचली असून आतापर्यंत 1,58,063 इतक्या लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

काल दिवसभरात 20,652 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,09,20,046 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,84,598 जण कोरोनावर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.