जळगावमधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 2 लाखांची मदत – मुख्यमंत्री

0
277

जळगावमधील किनगाव येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 मजुरांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले असून जखमींच्या त्वरित सुधारणेची कामना केली आहे. सोबतच मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून देण्याचे जाहीर केले. जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.