मुंबईच्या गटारातून निघालं २१ लाखाचं सोनं, पोलीस सुद्धा आश्चर्यचकित!

0
37

मुंबईच्या जुहू पोलिसांनी 17 वर्षांच्या अल्पवयीन चोरट्यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने सोन्याची चोरी करून मॅनहोलच्या झाकणात लपवून ठेवली होती यानंतर चोरटा मित्रांसमवेत स्वत: बिअर पार्टी करायला निघून गेला. मात्र पोलिसांनी त्याचा छडा लावत त्याला अटक केली असता त्याच्याकडून 21 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.मुंबईतील नेहरू नगर भागात राहणारी पूजा आपल्या कुटुंबासमवेत महाबळेश्वरला गेली असता यादरम्यान घरात ठेवलेले सुमारे 21 लाख रुपयांची सोन्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.तिने याबाबद जुहू पोलिसांकडे FIR दाखल केली यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरट्याला अटक केली.