नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

0
38

मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ माजली आहे. डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली, त्यानंतर डॉक्टरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. डॉक्टरच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.