तीराच्या इंजेक्शनसाठी पंतप्रधानांकडून 6 कोटींची सूट

0
31

तीरा कामत ही पाच महिन्यांची चिमुकली मुंबईच्या रुग्णालयात मृत्यूशी लढा देत आहे. तीराला एसएमए टाईप-1 या दुर्मिळ आजाराची बाधा झाली आहे. हा आजार जीवघेणा असून त्याच्यावरील उपचारही महागडा आहे. तीरावर उपचार करण्यासाठी अमेरिकेतून मागवलेल्या इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे. यापैकी 10 कोटी रुपये तीराच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे जमा केले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे इंजेक्शन दिल्यास तीरा केवळ 18 महिनेच जगू शकेल. अमेरिकेतून येणाऱ्या इंजेक्शनला टॅक्समधून सूट मिळावी यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यावर पीएमओने तात्काळ दखल घेत टॅक्समध्ये 6 कोटींची सूट दिली आहे.