8 महिन्यांच्या मुलीला विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश

0
39

पालघरमध्ये 8 महिन्यांच्या मुलीला विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आठ महिन्यांच्या मुलीला विकताना चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विक्रीच्या प्रयत्न झालेल्या चिमुकलीची सुटका करुन पोलिसांनी तिची रवानगी बालसंगोपन केंद्रात केली आहे. या प्रकरणी चारही आरोपींना कोर्टात हजर केले असता 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चिमुकलीच्या आईचे कोरोनाकाळात निधन झाले आहे. तर वडील चिमुकलीला सोडून गेले. त्यानंतर तिचा सांभाळ तिचे नातेवाईक करत होते.