Home Blog

कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांचा कडक पवित्रा ;म्हणाले ‘कायदा संसदेत झाल्याने तो संसदेतच रद्द करा

0

कृषी कायदा (farmers law)संसदेत झाला त्यामुळे तो तिथेच तो रद्द झाला पाहिजे अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे

 •  कृषी कायद्यांवरून शेतकरी आणखीनच आक्रमक झाले आहेत
 • सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो, पण सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या कमिटीत कोण लोक आहेत?
 • आम्ही समितीसमोरही जाणार नसून संसदेत कायदा झाला, तिथेच तो रद्द झाला पाहिजे
 • अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे
 • त्यामुळे शेतकरी आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली

शेतकरी आंदोलन चिघळणार !;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार शेतकऱ्यांसाठी उतरणार रस्त्यावर

0

स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)   आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत

 • केंद्र सरकार कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 52 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे
 • आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱ्या झाल्या
 • मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही
 • येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत
 • तशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली

‘दिल्लीत 51 लोकांना लस दिल्यानंतर त्रास जाणवला’- दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन

0

काल संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम (corona vaccination)पार पडली यामध्ये ही लस घेतल्यानंतर 51 जणांना थोडा त्रास झाला आणि एक गंभीर प्रकरण समोर आले

 • काल संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम पार पडली
 • यामध्ये राजधानी दिल्लीत लसीकरणाबद्दल दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला
 • म्हणाले”काल दिल्लीत 4317 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली’
 • ‘ ही लस घेतल्यानंतर 51 जणांना थोडा त्रास झाला आणि एक गंभीर प्रकरण समोर आले’
 • ‘ज्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते’
 • ‘या 15 जणांना काही वेळानंतर सुटी देण्यात आली’

शिवाई नगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी! चोराच्या कल्पकतेला मानले..

0

शिवाई नगर येथे ( Shivai Nagar)वारीमाता गोल्ड नावाचे ज्वेलर्सच्या दुकानात दुकानात चोरी झाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

 • शिवाई नगर येथे वारीमाता गोल्ड नावाचे ज्वेलर्सच्या दुकानात दुकानात चोरी
 • ही चोरी रात्री 2ते 2:30 च्या सुमारास झाली
 • त्यामध्ये अंदाजे 3 किलो पर्यंत सोन चोरीला गेल्याचा अंदाज आहे
 • या मध्ये चोराने मोठ्या कल्पकतेने ही चोरी केली आहे
 • चोराने रात्री दोन्ही दुकानामधील भिंतीला छोटेसे भगदाड पाडून आत प्रवेश केला
 • आणि सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले
 • पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

हुतात्मा दिनानिम्मित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना केले अभिवादन!

0

आज हुतात्मा दिन असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी लढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या हुत्यातम्यांना विनम्र अभिवादन केले

 • आज हुतात्मा दिन असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या हुत्यातम्यांना विनम्र अभिवादन केले
 • ते म्हणाले ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन’
 • ‘सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळले’
 • ‘तरीही आज या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा’
 • ‘कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली’
 • ‘त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध असून या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन’

महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी ;चिंता वाढली

0

महाराष्ट्रातील लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, बीड आणि रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूची (Bird Flu)प्रकरण आढळली

 • महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी
 • मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येक जिल्ह्यात पक्ष्यांना मारण्याची मोहीम सुरू झाली आहे
 • मात्र महाराष्ट्रात वाढता प्रभाग बघता चिंता वाढली
 • महाराष्ट्रातील लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, बीड आणि रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूची प्रकरण आढळली
 • याबाबदचे आणखी नमुने तपासणीसाठी नियुक्त केलेल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले

मुंबई महानगर पालिका नगर सेवक विजू शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई पालिका नगर सेवक विजू शिंदेंना (Viju Shinde)जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली

 • मुंबई पालिका नगर सेवक विजू शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
 • ते शिवसेना पक्षाचे नगर सेवक आहेत
 • त्यांनी याबाबद साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली
 • पुढील तपास सुरू

वॉशिंग्टन सुंदर अन शार्दुल ठाकूर दोघांची शतकी भागीदारी ;विराट कोहलीने उधळली स्तुतिसुमनं

0

वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीने शार्दुलचं मराठीत कौतुक केलं

 • ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताने छान फलंदाजी केली
 • वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली
 • भारताचा कर्णधार विराटने त्याच्या आणि सुंदरच्या खेळीची स्तुती केली
 • विशेष म्हणजे त्याने शार्दुलचं मराठीत कौतुक केलं “वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर, तुम्ही दोघांनी अतिशय मोक्याच्या वेळी तुमची उपयुक्तता सिद्ध केलीत’
 • ‘स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवत तुम्ही सामना भारतासाठी पुन्हा जिवंत केलात हीच कसोटी क्रिकेटची खरी मजा आहे’
 • ‘वॉशिंग्टन तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कमाल केलीस आणि तुला परत मानला रे ठाकूर!”
 • ‘अशा शब्दात त्याने दोघांचं कौतुक केलं’

पहिल्या नजरेतच अक्षय कुमार पडले ट्विंकल खन्नाच्या प्रेमात!; आज लग्नाला २० वर्ष पूर्ण..

0

आज अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांचा लग्नाचा 20 वा वाढदिवस

 • बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे इंडस्ट्रीतील आवडत्या कपल्स पैकी एक आहेत
 • आजरोजी 2001 मध्ये या दोघांचे लग्न झाले होते
 • दोघांच्या प्रेमाची उदाहरणे दूरदूरपर्यंत दिली जातात
 • त्यांच्या लग्नाला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत
 • अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची प्रेमकथा अगदी वेगळी आहे
 • अक्षय कुमार यांनी दोघांचा फोटो शेअर करत क्युट आणि प्रेमळ पोस्ट केली आहे

Photo: @akshaykumar

राजस्थामधील बस अपघाताच्या बातमीवर पंतप्रधानांनीही व्यक्त केलं दु:ख

राजस्थानमधील या बस अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी असल्याचं समजतंय

 • राजस्थामधील बस अपघाताच्या बातमीवर पंतप्रधानांनीही व्यक्त केलं दु:ख
 • “राजस्थानच्या जलोरमध्ये बस अपघाताच्या बातमीने प्रचंड शोककळा पसरली आहे”
 • “या अपघातात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत”
 • “मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या त्वरित स्वास्थासाठी प्रार्थन करतो”
 • नरेंद्र मोदी यांचं ट्वीट

ओडिसा सरकारने लसीकरण थांबवलं

सोमवारपासून पुन्हा सुरु करणार लसीकरण

 • ओडिसा सरकारने लसीकरण थांबवलं
 • काल ज्यांनी लस घेतली त्यांच्या निरीक्षणासाठी ओडिसा सरकारचा निर्णय
 • “ज्यांना लस दिली त्यांच्याकडे आमचे लक्ष आहे”
 • “सोमवारपासून सर्व 3.28 लाख आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरण पूर्ण होईपर्यंत सुरू राहील”
 • अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप्ता महोपात्रा यांची माहिती

सिग्नलच्या सेवेतील व्यत्यय झाला दूर

जास्त लोडमुळे सिग्नलच्या सेवेत आला होता व्यत्यय

 • सिग्नलच्या सेवेतील व्यत्यय झाला दूर
 • सिग्नलने स्वत: दिली माहिती
 • “सिग्नल परत आला!”
 • “एखाद्या प्रशिक्षण मँटेजमधून जाणाऱ्या एखाद्या मुलाप्रमाणे, आम्ही कालपासून बरेच काही शिकलो आहोत”
 • “आम्ही हे एकत्र केले”
 • “आपल्या संयमाबद्दल जगभरातील लाखो नवीन सिग्नल वापरकर्त्यांचे आभार”
 • “आम्ही क्षमता वाढवित असताना आपल्याला समजण्याची क्षमता आम्हाला प्रेरित करते”
 • सिग्नलने केलं ट्वीट

कंगनाचं उदाहरण देत शेफ विकास खन्नाने नेपोटिझमबाबतचा सांगितला अनुभव

शेफ विकास खन्नालाही करावा लागला नेपोटिझमचा सामना

 • कंगनाचं उदाहरण देत शेफ विकास खन्नाने नेपोटिझमबाबत व्यक्त केली खंत
 • “जेव्हा मी कंगनाला क्रिटीक्स, पक्षपात आणि नेपोटिझमवर भाष्य करताना ऐकायचो तेव्हा माझं मन दुखायचं”
 • “आज मी स्वत: याचा अनुभव घेतला”
 • “‘मिनियन्स’ एका बाहेरील व्यक्तीला आत नाही येऊ देत”
 • “भलेही त्याने कलेत पूर्ण जीव ओतून दिला असावा”
 • “हे ऐकणं खूप वेदनादायक आहे – किंमत द्या नाही तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करुन टाकू”
 • विकास खन्ना ट्वीट करत व्यक्त केली खंत

पीएम केअर फंडप्रकरणी 100 सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर अधिकाऱ्यांनी उपस्थित केले प्रश्न

 • पीएम केअर फंड प्रकरण
 • 100 सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
 • जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी
 • “पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे”
 • “कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना राज्यांची सरकारं त्रस्त झाली होती”
 • “त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अजूनही आहे”
 • अधिकाऱ्यांनी पत्रात केलं नमूद

कोविड लस घेणाऱ्यांमध्ये 51 प्रतिकूल घटना नोंदल्या गेल्या; एक जण एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल

 • दिल्लीत कोविड लस घेणाऱ्यांमध्ये 51 प्रतिकूल घटना नोंदल्या गेल्या
 • त्यापैकी 1 एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल
 • 51 जणांपैकी 2 प्रकरणे हॉस्पिटलमधून असल्याची माहिती
 • तर राष्ट्रीय राजधानीच्या उत्तर रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयातून 2 प्रकरणे समोर
 • “प्राप्तकर्त्याचे 10 मिनिटे निरीक्षण केले गेले”
 • “ज्यादरम्यान त्याला डोकेदुखी, पुरळ, श्वसन त्राससारख्या समस्या दिसून आल्या”
 • प्रत्यक्षदर्शींची माहिती
 • एम्सच्या सुरक्षा रक्षकालाही लस घेतल्यानंतर अॅलर्जी झाल्याची माहिती
 • त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे
 • एम्सच्या अधिकाऱ्यांची माहिती
Exit mobile version