मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली गाडी, पोलिसांचा तपास सुरू 

0
58

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस या घराच्या परिसरात एक संशयास्पद गाडी आढळून आली आहे. या गाडीत जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडीची तपासणी केली. या गाडीतून जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने घातपाताच्या उद्देश असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.