पुण्यातील गुंड रूपेश मारणेसह ७ जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
43

पुण्यातील कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंड रूपेश मारणे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.१४ फेब्रुवारी रोजी समर्थ पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव व बालाजी शिंदे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका घाबरलेल्या व्यक्तीकडून काही लोक रास्ता पेठेतील चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल येथिल रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असून, त्या व्यक्तीला वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीने दमबाजी केल्याची माहिती मिळाली.
यामध्ये  पोलीस घटनास्थळी पोहोचताच तेथील लोक पळून गेले मात्र यामध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. या आरोपावरून कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंड रूपेश मारणे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.तसेच विविध कायद्यांनुसार सहा ते सात जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.