नवनीत राणा अन रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल, हे आहे कारण… 

0
388

खासदार नवनीत राणा ,आमदार रवी राणा यांच्या सह पंधरा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यांना कोरोनाचे नियम न पाळणे भोवले आहे. अमरावती शहरात शिवजयंती कार्यक्रमात विनामास्क उपस्थित राहणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्या प्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, रवी राणा आणि नवनतीत बुलेट वर विनामास्क सवारी केल्या प्रकरणी मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याच समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीवर प्रवास करतांना मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस राणा दाम्पत्यावरही तशीच कारवाई केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित झाला.