मुंबईत मेट्रोसाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गात अचानक लागली आग!

0
31

मुंबईत अंधेरी पूर्वेत seepz 1 नंबर गेटच्या समोर मेट्रोसाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे .ही कामे व्यवस्थित सुरू असतांना अचानक आज (11 फेब्रुवारी) रोजी दुपारी 2 च्या सुमारास मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवायचा प्रयत्न करत आहे.प्राथमिक माहितीमध्ये आग भुयारी मार्गाच्या आत केबलमध्ये लागली आहे.सध्या seepz ते JVLR ला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.