मुंबईच्या मंडला परीसरातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग

0
46

आज मुंबईच्या (Mumbai)मंडला परीसरामधिल भंगाराच्या गोदामाला दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग (Fire)लागली आहे.सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान , २०-फायरवाहन, ९-वॉटर टँकर, १-रेस्क्यु वाहन तसेच ३-रूग्णवाहीका दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग लेवल-३ ची असल्याची माहिती मिळाली. घटनेमध्ये अद्याप कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मुंबई आ. व्य. कक्षातून मिळाली.

  • मुंबईच्या मंडला परीसरातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग
  • घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल
  • आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
  • घटनेमध्ये अद्याप कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती