होमीओपॅथी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

0
63

राज्यातील होमीओपॅथी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. अनेक दिवसांपासून होमीओपॅथी डॉक्टरांच्या सरकारकडे मागण्या आहेत.त्यासाठी संप पुकारण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता. यावर सविस्तर चर्चेसाठी ही बैठक पार पडली.यावेळी होमीओपॅथी डॉक्टर्स ग्रामीण आरोग्य सेवेतील महत्त्वाचे घटक आहेत असे सुद्धा आरोग्यमंत्री म्हणाले. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. वेतनातील तफावत दूर करण्याबाबतही केंद्र शासनाकडे मागणी केली जाणार आहे.