लसीकरणानंतर भारतात एकूण 27 जणांचा मृत्यू, मात्र…

0
65

देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. भारतात एकूण 27 जणांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला असून त्यापैकी 3 जणांनी गेल्या 24 तासात आपला जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही मृत्यूचा आतापर्यंत लसीकरणाशी संबंध आढळून आलेला नाही. असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जवळपास 80.05 लाख लोकांना आतापर्यंत देशात लस देण्यात आली आहे.