आमिर खानची मुलगी इराने केला आपल्या प्रेमाचा खुलासा

0
174

व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांवर असताना नुकताच आमिर खानची मुलगी इराने आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. इरा खानने आपला कथित प्रियकर नुपूर शिकरेसोबत काही फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. या फोटोत इरा नुपूरसोबत दिसत आहे. त्यांचे हे रोमँटिक फोटो दोघांच्या नात्याबद्दल बरंच काही सांगून जातात. इराने फोटोंसोबत छान कॅप्शनही दिलं आहे. तुझ्यासोबत घेतलेलं प्रत्येक वचन पूर्ण करणं हे माझ्यासाठी सम्मानाची गोष्ट आहे असं म्हणत इराने खूप सारे हॅशटॅग दिले आहेत. नुपूर हा इराचा फिटनेस कोच असून बऱ्याच काळापासून या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा होत्या.