भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

0
35

भाजपा नेत्या आणि महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पती विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधीही किशोर वाघ यांना अटक करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीविरोधात टीकेची झोड उठवली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.