रेखा जरे हत्या प्रकरणातील आरोपीला हैदराबादमधून अटक

0
34

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैद्राबादमधून अटक केली आहे. जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब संबंधित आरोपींनी दिला होता.