अभिनेते आशीष विद्यार्थी यांना कोरोनाची लागण

0
42

 

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. या  दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशीष विद्यार्थी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हि माहिती त्यांनी स्वतः हा इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली. “मला कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या दिल्लीतील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी देखील स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर आहे. काळजी करु नये.” अशा संदेश त्यांनी दिला आहे.