ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालंय. हृदयविकाराचा झटका त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. राजीव कपूर यांनी वयाच्या 59व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेंबूर येथील इंलॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. रणधीर कपूर यांनी आपल्या भावाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र दुर्देवानं उपचार सुरु करण्यापूर्वीच राजीव कपूर यांची प्राणज्योत मावळली. रणधीर कपूर यांनीच राजीव कपूर यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि दु:ख व्यक्त केलं.
- ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन
- वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालंय
- चेंबूरच्या इंलॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली
- राजीव कपूर हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे लहान भाऊ होते