अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण, आई नीतू कपूर यांची माहिती

0
34

अभिनेता रणबीर कपूरला कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र रणधीर कपूर यांनी त्याला कोरोना झाल्याच्या वृत्तावर बोलणे टाळले आहे. यांनी रणबीर सध्या आजारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु काही वेळापूर्वी रणवीर कपूरची आई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रणवीरला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

एका नामांकित वृत्तवाहिनीने अभिनेता रणधीर कपूर यांच्याशी संपर्क असता यांनी अगोदर ‘हो’ म्हणाले नंतर लगेच रणबीरला कोरोनाची लागण झाली आहे कि नाही, याबाबत मला माहिती नाही. कारण मी मुंबई बाहेर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रणबीर आजारी असून तो आराम करतोय, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

मात्र आई नीतू कपूर यांच्या पोस्टने हि बातमी कन्फर्म झाली आहे.