अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक

0
38

अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशी याला ईडीने अटक केली आहे. सचिन जोशी विजय मल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर नावाचा बंगला खरेदी केल्यामुळे चर्चेत आला होता. आता ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी सचिन जोशीची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने ओमकार समुहाच्या तीन कार्यालयांवर छापे टाकले होते. एसआरएसाठी यस बँकेकडून घेतलेले कर्ज इतर व्यवहारांसाठी वापरल्याचा ओमकार समुहावर ठपका आहे.

सचिन जोशी गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा आहे. पान मसाला, अत्तर, दारू, गुटखा यांची निर्मिती करणाऱ्या जेएमजे समुहाचा प्रमोटर तसेच प्लेबॉय या रेस्टॉरंट आणि क्लब चेनच्या भारतीय फ्रँचायजीचा मालक आहे