गरजूंना मिळणार मदतीचा हात, अभिनेता सोनू सूद लॉन्च करतोय ‘Sonu For You App’

0
23

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले होते. त्याकाळात गरजू नागरिकांसाठी देव म्हणून उभा राहिला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. तो अजूनही गरजूंना मदत मिळावी यासाठी तत्पर असतो, त्याचे उदाहरण म्हणजे सोनू आता एक अ‍ॅप लॉन्च करत आहे. ज्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळणार आहे आणि केवळ वेळेवर रक्त मिळाले नाही, म्हणून रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होणार आहे.

यात रक्त घेणारा आणि रक्त दाता थेट एकमेकांशी जोडले जातील. या अ‍ॅपमुळे कोणत्या रुग्णाला, कुठल्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे. हे या अ‍ॅपच्या माध्यमाने आपल्याला अपोआप कळू शकेल.

सोनूने Sonu For You या नावाने एक अ‍ॅप तयार केले आहे. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढणार आहे. ही माहिती सोनुने ट्विट करून नागरिकांना दिली आहे. तसेच हे अ‍ॅप लवकरच लॉन्च होऊन गरजूंना मदतीसाठीचा एक नवीन हात तयार होणार आहे.