अभिनेता सोनू सूदच्या कामगिरीसाठी स्पाइस जेटकडून अनोखा सलाम

0
34

अभिनेता सोनू सूदने गेल्या वर्षी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच अद्यापही त्याचे काम सुरूच आहे. कोरोनाच्या काळात त्याने अनेकांना केलेल्या मदतीमुळे आजही लोक त्याला देवाचा अवतार समजतात. लाखो गरीब लोकांना एक पैसाही न घेता त्याने बसेस, गाड्या आणि विमानांद्वारे घरी पोहोचण्यास मदत केली आहे. या कामगिरीमुळे सोनू सुदचं कौतुक सगळ्याच क्षेत्रात केले जाते.    

मात्र आता एका विमान कंपनीने सोनू सूदच्या कार्याबद्दल अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे. स्पाइस जेट या कंपनीने सोनू सूद यांना सलाम करताना त्यांच्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे चित्र काढले आहे. या चित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे – ‘ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद’