अदानी समूह करणार दिघी बंदराचा विकास

0
68

भारतातील सर्वात मोठं कंन्टेनर पोर्ट म्हणजे JNPT आणि याच JNPT ला पर्याय म्हणून दिघी बंदर विकसित करण्यात येत आहे. दिघी बंदराचा विकास अदानी समूह करणार आहे. अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनने दिघी बंदराची अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना 705 कोटी रुपये खर्च लागला आहे. दिघी बंदराच्या विकासासाठी अदानी समूह 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या वतीनं 15 फेब्रुवारी 2021 रोजी दिघी बंदराचे अधिग्रहन पूर्ण करण्यात आलं आहे. या बंदराच्या विकासामुळे भारताच्या जीडीपीत वाढ होणार, अशी माहिती अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या वतीने देण्यात आली आहे. या बंदराच्या विकासामुळे मुंबई- पुणे या औद्योगिक पट्ट्याचा विकास होणार असल्याचंही त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.