नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनासंदर्भात राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

0
20

मुंबई: नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनासंदर्भात राज्याचे राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. विशेषत: सदनामधील आहार व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांना चालना देणे, महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे संग्रहालय उभारणे आणि खासदार, दिल्लीतील महाराष्ट्रीय अधिकारी, यूपीएससीचा अभ्यास करणारे राज्यातील विद्यार्थी यांच्यासाठी ग्रंथालय, ई-लायब्ररीसारख्या सोयी-सुविधा निर्माण करणे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीस खासदार अरविंद सावंत, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल हे ऑलनाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले. सदनामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे संग्रहालय उभारण्यासंदर्भात आपण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करु असे सांगितले. त्याचबरोबर सदनामध्ये ग्रंथालय, ई-लायब्ररी आदींचाही विकास करण्यात यावा, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी दिल्या.