आदित्य ठाकरेंच्या पवई लेकच्या सुशोभिकरणासह इतर कामांना वेग देण्याच्या सूचना

0
40

मुंबई महापालिकेच्या परिमंडळ 6 मधील S वॉर्डातील चालू तसेच प्रस्तावित विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच पवई लेकचे सुशोभीकरण, लेक परिसरात पायाभूत सुविधांचा विकास, पाथवेचा विकास आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित कामं गतिमान करावी अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. पाणी टंचाई संबंधितचाही प्रश्न काही नगरसेवकांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडला, त्यावर उन्हाळ्यापूर्वी पाहणी करुन पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी कारवाई करावी अशी सूचनाही आदित्य ठाकरेंनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस परिवहन मंत्री अनिल परब, आ. रमेश कोरगांवकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह S वॉर्डमधील संबंधीत नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.