कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

0
55

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी तयार राहण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत 122 प्रभागांती आरक्षण रचना तयार करुन ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली प्रशासनाने घेतला आहे. प्रभाग आरक्षण जाहीर करण्यासाठी अत्रे किंवा सावित्रीबाई फुले रंगमंदिरात जाहीर कार्यक्रम घ्यावा लागणार असून त्या वेळी करोना संसर्गाचे नियमांचे कसे पालन करायचे असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रभाग रचना आरक्षण सोडत कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.