महिलांना स्वच्छ अन सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा, ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ‘वुलू’ ॲपचे लोकार्पण

0
30

मुंबई: काल ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. यामध्ये महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ‘वुलू’ (WOLOO) ॲपचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप अतिशय नाविन्यपूर्ण असून महिलांच्या उपयोगी येणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲपचे निर्माते मनीष केळशीकर आदी उपस्थित होते.
वुलू ॲप हा पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम असून जागतिक महिला दिनानिमित्त याचे लोकार्पण होत आहे. याबाबत आनंद व्यक्त करुन या ॲपचा महिलांनी वापर करावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी केले.