आंध्र प्रदेश: विजेच्या पोलला धडकले एअर इंडियाचे विमान, प्रवासी सुरक्षित 

0
34

विजयवाडा: 64 प्रवाशांना घेऊन विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असणारे एअर इंडियाचे विमान  विजेच्या खांबाला धडकले. विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गन्नाराममधील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान विद्युत खांबाला धडकले. विमानतळाचे संचालक जी मधुसूदन राव यांच्यानुसार , विमानातील सर्व 64 प्रवासी आणि चालक दल सदस्य सुरक्षित आहेत. हे उड्डाण डोहाहून येत होते, त्यावेळी हा अपघात झाला.