अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लवकरच आई-बाबा होणार आहेत. गेल्या वर्षी 8 मे रोजी दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. अक्षयने आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अक्षयच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यानं चाहतेही आनंदी आहेत. अक्षयने बस स्टॉप, बेधडक आणि फत्तेशिकस्तसारख्या बऱ्याच सिनेमांत आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.