नागपुरात दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद 

0
32

नागपूर: कोरोनाचा प्रभाव पाहता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहे. आता नागपुरात कठोर नियम लागू करण्यात येत आहेत. येत्या शनिवार अन रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. नागपुरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी याबाबतचे सुधारीत आदेश जारी केले आहेत. त्याशिवाय नागपुरातील ग्रंथालये, अध्ययन कक्ष, स्वीमिंग पुल सुद्धा बंद राहणार आहेत. तसेच आजपासून मंगल कार्यालये, लॅानमधील लग्न समारंभाला प्रतिबंध घालण्यात आला आहे.