भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा – अंजली दमानिया

0
24

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी केली आहे. वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत अंजली दमानिया यांनी न्यायालयात लेखी मागणी केली आहे.