देशात सर्व नागरिकांना लस मिळालेली नाही तरीही लस विदेशात दान, हायकोर्टाची नाराजी 

0
48

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सध्या सुरु झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसंच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. त्याचवेळी अन्य देशांनाही भारताकडून मोठ्या प्रमाणात कोरोना लशीचा पुरवठा केला जात आहे. यावर दिल्ली हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.‘देशातील सर्व व्यक्तींचे लसीकरण अजून झालेले नाही आणि आपण कोरोना लस अन्य देशांना पाठवत आहोत,’ असे हायकोर्ट म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन निर्मितीच्या क्षमतेची माहिती द्यावी असे निर्देश देखील हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणात जबाबदारीची भावना हवी,’ असे मत न्या. विपीन सांघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठानं व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचे काम टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोव्हिड योद्ध्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे.