अमिताभ बच्चन यांनी पटकावला सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार

0
58

अमिताभ बच्चन हे नाव कोणाला माहित नाही असं या जगात कोणीच नाही, कारण संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी हे एक नाव आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या अभिनयातून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे. परंतु आता त्यांच्या या शैलीचे कौतुक ‘इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ करणार आहे. कारण बिग बींना आता  FIAF या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

आपल्या भारतासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे कारण, हा पुरस्कार पटकावणारे बिग बी आता  भारतातील पहिले अभिनेता ठरले आहेत. तसेच हा पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलनयेत्या 19 मार्चला हा पुरस्कार त्यांना प्रदान करणार आहेत.