सर्जरीनंतर बिग बींनी शेअर केला फोटो

0
35

बिग बी अमिताभ बच्चन यांनी सर्जरीनंतर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या कानावर शस्त्रक्रिया झाल्याचे दिसत आहे. मात्र त्यांनी याबाबत जास्त माहिती दिली नाही. तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचा मी आभारी असल्याचा मॅसेज त्यांनी लिहिला आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी सर्जरी होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. नक्की कसली सर्जरी होणार याबाबत चाहत्यांमध्ये चिंता होती. मात्र आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी माहिती दिल्यानंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.