माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे नविन गाणं रिलीज झाले आहे. व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी हे गाणं सोशल मीडियावर शेअर केले आहे. ये नयन डरे डरे असं या गाण्याचे बोल आहेत. आतापर्यंत जवळपास 50 हजारांच्या आसपास लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अमृता फडणवीस यांना ‘तिला जगू द्या’ गाण्यावरून ट्रोल करण्यात आले होते.