राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजार रुग्णांची वाढ

0
25

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात चिंता वाढलीये. आजही राज्यात 25 हजार 681 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढत्या रुग्णांनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला दिसतोय.

आज राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ८९ हजार ९६५ कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९०.४२ टक्के एवढे आहे.