लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात !

0
38

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत यादरम्यान २६ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांकडून ‘ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली होती मात्र यादरम्यान हिंसाचार उसळला होता .तसेच लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त एक ध्वज फडकवला गेला होता या प्रकरणामुळे शेतकरी आंदोलन अधिकच उग्र होत चालले होते. दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी बुराडीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पाच जणांना अटक सुद्धा केलीय. आता यामध्ये दिल्ली पोलिसांकडून आणखीन एका अटक करण्यात आलीय. आरोपी इकबाल सिंह असे या आरोपी व्यक्तीचे नाव आहे.आरोपीला मंगळवारी रात्री पंजाबच्या होशियारपूरमधून ताब्यात घेण्यात आले. इकबाल सिंह याची माहिती पोलिसांना देणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली होती.

  • केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे
  • २६ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांकडून ‘ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली होती
  • यामध्ये दिल्ली पोलिसांकडून आणखी एकाला अटक