शुक्रवारी मुंबईत एकूण 2 लाख 60 हजार लसींचा आणखी साठा दाखल

0
24

मुंबईत 16 जानेवारीला सुरु झालेल्या लसीकरणाला आता वेग आला आहे. शुक्रवारी मुंबईत एकूण 2 लाख 60 हजार लसींचा आणखी साठा दाखल झाला आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेला एकूण 5 लाख 24 हजार 500 लस उपलब्ध झाल्या असल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी मुंबईत एकूण 6361 जणांना लस टोचण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 7 हजार 725 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे.