ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय जो बायडन सरकारकडून रद्द

0
44

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी इतर देशातील नागरिकांना गुड न्यूज दिली आहे. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळात ग्रीन कार्ड देण्यास लागू केलेली बंदी हटवली आहे. बायडन यांच्या या निर्णयामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या कारणांमुळे बेरोजगारीशी दोन हात करण्याचे कारण देत २०२० अखेरपर्यंत ग्रीन कार्ड देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवली. ही अशाप्रकारची बंदी अमेरिकेच्या हिताची नसल्याचे बायडन यांनी सांगितले.
बायडन म्हणाले ,मागील प्रशासनाच्या निर्णयामुळे अमेरिकेला नुकसान झाले आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या उद्योगांनाही प्रभावित करत आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या आदेशामुळे बहुतांशी इमिग्रेशन व्हिसावर बंदी घातली होती.