आणखी एका टीव्ही अभिनेत्याची गळफास घेत आत्महत्या 

0
42

तमिळ टीव्ही अभिनेता इंद्र कुमारने मित्राच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी इंद्र कुमार मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता .तिथून परत्यावर इंद्रकुमार त्याच्या मित्राच्या घरी एकटा होता.दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्र कुमार रुमचा दरवाजा उघडत नसल्याने मित्राने दरवाजा तोडला. त्यावेळी त्याला इंद्राचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. इंद्र कुमारच्या मित्राने तातडीने याविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

इंद्र कुमारने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला याबाबद अजून कुठलीही माहिती पोलिसांनी दिली नाही.दरम्यान घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट आढळली नसून इंद्र कुमारनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण समजू शकलेले नाही.