API भूषण पवार यांची पोलीस ठाण्यात आत्महत्या

0
38

नवी मुंबई: APMC पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी सरकारी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस ठाण्यातच त्यांनी आत्महत्या केल्याने एकच धावपळ उडाली. भूषण पवार यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. एक वर्षापासून ते APMC पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

आत्महत्या केलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बॉडी बिल्डर होते. त्यांनी शरिसौष्टवामधील भारतश्री हा पुरस्कार पटकावला होता.